आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेने घेतला गळफास, परिचारिका महाविद्यालयातील प्रकार

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिचारिका महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी परिचारिकाने गळफास लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. माधुरी टोपले असे या परिचारिकाचे नाव आहे.

फोनवर बोलत बोलत...

याबाबत सिव्हिल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा येथील माधुरी टोपले ही मुलगी परिचारिका महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी एएनएमला शिक्षण घेत होती. रात्री हॉस्टेलमध्ये एका प्रशिक्षणार्थीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करताना माधुरीला फोन येत होता. ती फोनवर बोलत तिच्या रुममध्ये निघून गेली. रात्री उशिरा केव्हा तरी तिने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे प्रशिक्षणार्थी मुलींच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वॉर्डनला याबाबत कळवले.

पोलिसांचा तपास सुरू

सिव्हिलचे अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधा डिया,मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.निखिल सैदाणे, अधीसेविका शुभांगी वाघ हे तातडीने दाखल झाले. सरकारवाडा पोलिस घटनास्थळी येऊन पुढील तपास सुरू केला आहे.

कुटुंबियांना धक्का

मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मृत परिचारिकाचे कुटुंबियांना कळवण्यात आले. त्यांना या घटनेने धक्का बसला आहे. जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिकाने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील चिंतेत आहे.

बातम्या आणखी आहेत...