आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा:नाफेड मार्फत खरेदी हाेणार उन्हाळी कांदा, केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी दिली ग्वाही

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचे नुकसान टाळण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी करावा यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गाेयल यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही वाणिज्य मंत्र्यांनी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.पवार यांनी दिली.

कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशभरातील साधारण 30.03 टक्के वाटा असलेल्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले परंतू अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी याकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

गतवर्षी 2 लाख 38 हजार 196 मेट्रीन टन कांद्याची खरेदी

राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 2022 मध्ये 351 कोटी रकमेचा 2 लाख 38 हजार 196 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी 1 हजार 475 रूपये प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांदा खरेदी करण्यात येणार असल्याचे डाॅ.भारती पवार यांनी सांगितले.