आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय मागील महिन्यात जाहीर केल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील सर्वच खाद्यतेलाचे दर कमी हाेण्याला सुरूवात झाली आहे. स्थानिक बाजारात याचा चांगला परिणाम दिसत आहे. किरकोळ बाजारात सोयाबिन, सुर्यफूल तेलाचे दर लिटरमागे १५ ते २० रुपयांनी तर पामतेलाचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप इंडोनेशियातून प्रत्यक्ष पामतेलाची खेप भारतात पाेहाेचलेली नसतानाही सामान्यांना हा दिलासा मिळाला.
भारतात एकूण वापराच्या ६८ टक्के खाद्यतेल आयात केले जाते. यात युक्रेन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना देशाचा मोठा वाटा आहे. मात्र, रशिया- युक्रेन युद्धामुळे भारताची सूर्यफूल तेलाची तर इंडोनेशियाने केलेल्या निर्यातबंदीमुळे पामतेलाची आयात बंद झाली. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे भाव वाढले होते. अगोदरच महागाईने होरपळत असलेल्या सामान्यांना, खाद्यतेलाच्या महागलेल्या दरांनी बेजार केले होते. केंद्र सरकारने यात दिलासा देण्यासाठी आयातशुल्क पूर्णपणे माफ करण्याची तसेच सेसही हटविण्याची घाेषणा केली हाेती. याचा परिणाम म्हणजे इंडोनेशियातून भारतात तेलाची खेप पाेहाेचण्यापूर्वीच सर्वच तेलाचे दर कमी हाेत आहेत. सध्या बाजारातील खाद्यतेलाची मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे दर अजून घसरू शकतील.
मागणी कमी झाल्याचा परिणाम
इंडोनेशियाने निर्यातबंदी उठवल्यानंतर खाद्यतेलाचे दर कमी झाले. केवळ शेंगदाणा तेलाचा अपवाद आहे. गाईच्या तुपाचे भाव कमी झाले असले तर इतर तुपाचे दर कमी झालेले नाहीत. बाजारातील तेलाची मागणीदेखील कमी झाल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल.
प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटना
पावसावर सर्व अवलंबून
^सध्या दर कमी झाले असले तरी यापुढचे दर सर्व पाऊस वेळेवर सुरू हाेताे की लांबताे यावर अवलंबून असतील. कारण, येणाऱ्या पिकाचे भवितव्य पावसावरच अवलंबून असते. त्यावरच अंदाज व्यक्त करून घडामोडी ठरतात.
- परेश बोघाणी, खाद्यतेल ब्रोकर
स्थानिक बाजारात खाद्यतेलाचे दर ( प्रती लिटर / रूपये) खाद्यतेल प्रकार सोमवारचे मागील महिन्यातील दर दर सूर्यफूल तेल १९५ रु. २१० रु. सोयाबीन तेल १६० रु. १८० रु. पाम तेल १५० रु. १६० रु. शेंगदाणा तेल २०० रु २०० रु. गाईचे तूप ६०० रु. ६२० रु.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.