आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांना माेठा दिलासा:इंडोनेशियाच्या निर्णयानंतर सूर्यफूल, सोयाबीन तेलाचे दर लिटरमागे 20 रुपयांनी घसरले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडाेनेशियाने पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय मागील महिन्यात जाहीर केल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील सर्वच खाद्यतेलाचे दर कमी हाेण्याला सुरूवात झाली आहे. स्थानिक बाजारात याचा चांगला परिणाम दिसत आहे. किरकाेळ बाजारात साेयाबिन, सुर्यफुल तेलाचे दर लिटरमागे 15 ते 20 रुपयांनी तर पामतेलाचे दर 10 रुपयांनी कमी झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, अद्याप इंडाेनेशियातून प्रत्यक्ष पामतेलाची खेप भारतात पाेहाेचलेली नसतांनाही हा दिलासा सामान्यांना मिळाला आहे.

भारत एकुण वापराच्या 68 टक्के खाद्यतेलाची आयात करीत असताे, यात युक्रेन, रशिया, मलेशिया, इंडाेनेशिया, अर्जेंटिना या देशाचा मोठा वाटा आहे. मात्र, मार्च महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले जे अद्यापही सुरू आहे. यामुळे भारताची सूर्यफूल तेलाची तर इंडाेनेशियाने केलेल्या निर्यातबंदीमुळे पाम तेलाची आयात बंद झाल्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे प्रचंड वाढले होते. अगाेदरच महागाईने होरपळत असलेल्या सामान्यांना, खाद्यतेलाच्या महागलेल्या दरांनी बेजार केले होते.

केंद्र सरकारने यात दिलासा देण्यासाठी आयातशुल्क पुर्णपणे माफ करण्याची तसेच सेसही हटविण्याची मोठी घाेषणा केली हाेती. याचा परिणाम इंडाेनेशियातून भारतात तेलाची खेप पाेहाेचण्यापुर्वीच सर्वच तेलाचे दर कमी हाेत आहेत. सध्या बाजारातील खाद्यतेलाची मागणी कमी झालेली असून दर पावसाळ्यात तेलाची मागणी आणखी कमी हाेत असते. त्यामुळे हे दर अजून घसरतील असे मानले जात आहे.

असे आहेत स्थानिक बाजारात खाद्यतेलाचे दर ( प्रती लिटर / रूपये)

खाद्यतेलाचा प्रकारसाेमवारचे दरमागील महिन्यातील दर
सुर्यफुल तेल195 रू210 रू
सोयाबीन तेल160 रू180 रू
पाम तेल150 रू160 रू
शेंगदाणा तेल200 रू200 रू
गाय तुप600 रू620 रू

तेलाची मागणी कमी झाल्याचे परिणाम

इंडाेनेशिया निर्यातबंदी उठल्यानंतर सर्वच खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. केवळ शेंगदाणा तेलाचे दर कमी झालेले नाहीत, तुपही महागलेले हाेते, गायीचे तुप कमी झाले असले तर इतर तुपाचे दर कमी झालेले नाही, असे अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...