आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार:कृत्रिम हात प्रत्यारोपणाद्वारे मिळणार आधार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ, इनाली फाउंडेशन व श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम पाय व कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयाेजन रविवारी, दि.१५ जानेवारी राेजी करण्यात आले आहे.

कृत्रिम हात हा बॅटरीवर चालणारा असून तो वजनाने हलका असेल. या हाताने आपण आपले दैनंदिन कामे अगदी व्यवस्थितपणे करू शकताे. कृत्रिम हात बसवण्यासाठी कोपरापासून पुढे किमान चार इंच हात असणे आवश्यक आहे. संस्थेच्या वतीने सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत गंगापूर राेडवरील बालाजी लॉन्समध्ये शिबिर आयाेजित करण्यात आले आहे. शिबिरात बसविण्यात येणाऱ्या पायाची मापे घेतली जाणार असून कृत्रिम पाय तयार झाल्यावर संबंधितांना संपर्क करून बोलविण्यात येईल.

गरजवंतांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र धारणकर ९७६६२००२४१, पंकज परसरामपुरीया ९८५०८४१२६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक विचारातून कार्य
अपघात वा अन्य कारणांमुळे हात गमावलेल्या नागरिकांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागताे. काेणतीही कृृती करण्यासाठी अनेकदा दुसऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. याचाच विचार करत रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ व सहकारी सामाजिक बांधिलकी जपेल.

बातम्या आणखी आहेत...