आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या, अलवार स्वरांची रुणझुण आणि कोवळे शब्द यांची अनुभूती सकाळच्या किरणांनी सजून गेली आणि शब्दांना नवा साज देऊन गेली. नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले हाेते.
केतन इनामदार यांचे गायन झाले. त्यांना सौरभ ठकार (तबला) व संस्कार जानोरकर (संवादिनी) दिगंबर सोनवणे (पखवाज) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. मैफलीचे हे २१ वे पुष्प होते. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर यांचे आयोजन व संकल्पना विनायक रानडे यांची हाेती. ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोरील सभागृहात सावरकरनगर येथे ही मैफल रंगली. केतन इनामदारचे सुरुवात नट भैरव रागाने केली. बंदिश अन् राग सादरीकरणातून मैफल रंगली.
यात अनोखी जाण केतनच्या गायनात होती. मैफलीस साहित्यिक रंगनाथ पठारे, राजन गवस, कवी प्रकाश होळकर, सुमती लांडे, संध्या नरे पवार, विलास हावरे, डॉ. मनोज शिंपी, संगीता चव्हाण, मिलिंद धटिंगण, मकरंद हिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. सायबर सुरक्षेविषयी स्वाती गोरवाडकर यांनी मार्गदर्शन केले
संगीत ही तर ईश्वराची देणगी : सयाजी शिंदे
अभिनेते सयाजी शिंदे यांचे हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला. शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक करीत संगीत ही ईश्वराची देणगी असल्याचे सांगितले. गायन सादर करणारे कलाकार अलौकिक प्रतिभेचे असतात. झाड लावणे, त्याचे संगोपन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षण, निरोगी, दीर्घायुष्यासाठी झाडे लावणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.