आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदाकाठी मंदिर:नाशिकमध्ये स्वामीनारायण मंदिराचा सुर्वणकलश पूजन साेहळा उत्साहात; सदगुरू भक्तीप्रिय स्वामींची उपस्थिती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी नारायण महाराजाचा हाेणारा जयघाेष...मंत्राेच्चार अन उपस्थित साधु्गण अशा भक्तीमय अन उत्साहाच्या वातावरणात शहरातील तपाेवन येथील केवडीबन परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वामीनारायण मंदिराच्या सुर्वणकलश व ध्वजदंड पूजन साेहळा सदगुरू भक्तीप्रिय स्वामी ( काेठारी बापा ) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.

गाेदाकाठालगत असलेल्या केवडीबन परिसरालगत तब्बल तीन एकरमध्ये हे मंदिर साकारले जात आहे. पाच शिखरांचे असलेले बीएपीएस स्वामी नारायण मंदिराच्या निर्मितीसाठी खास धाेलपुरी दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या शिखरावर लावण्यात येणारे कलश व ध्वजदंडाच्या पूजन साेहळ्याचे शुक्रवारी दि. 3 आयाेजन करण्यात आले हाेते. सकाळी मंदिर परिसरात 80 हून अधिक साधुगणाच्या उपस्थित सकाळी 6 वाजता या साेहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी माेठ्या संख्येने भाविक देखील या पूजन साेहळ्यात सहभागी झाले हाेते. या नंतर भक्तीप्रिय स्वामी यांच्या हस्ते कलश पूजन पार पडल्यानंतर सामूहिक आरती करत कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी स्वामी नारायण महाराजांच्या जयघाेषाने परिसर दुमदुमून गेला. कलश पूजन साेहळा डाेळ्यात साठविण्यासाठी देशासह विदेशातूनही भाविक या ठिकाणी आले हाेते.

सप्टेंबरमध्ये प्राणप्रतिष्ठा

शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या बीएपीएस स्वामी नारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा साेहळा २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यावेळी प्रभू रामचंद्र, त्र्यंबकेश्वरचे ज्याेर्तिलिंग, महाभारतातील पांडवांचे वास्तव्य या पाैराणिक आठवणींना या मंदिराच्या रचनेतून उजाळा देण्यात आलेला आहे. मंदिर परिसरात भव्य असले प्रसादालय, संत आश्रम, भक्तनिवास व संत्सग सभागृह देखील साकारण्यात आलेले आहे. शहरातील या मंदिराचे प्रमुख म्हणून महाव्रत स्वामी महाराज तर मंदिराच्या उभारणीची जबाबदारी याेगीप्रियदासजी महाराज सांभाळत आहे. प्रमुख स्वामीजी महाराज यांनी २००३ मध्ये गाेदाकाठी मंदिर उभारण्याचा संकल्प केला हाेता. त्यानुसार २०१७ मध्ये या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्याची माहिती अमित पटेल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...