आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:नाशिकमधील अतिसंवेदनशील आर्टिलरी सेंटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनद्वारे टेहळणी; हेरगिरीचा संशय

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशकातील आर्टिलरी सेंटर परिसरात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ८०० फूट उंचीवरून ड्राेन उडत असल्याचे दिसल्यानंतर खळबळ उडाली. अतिसंवेदनशील असलेला हा भाग ड्रोनसाठी प्रतिबंधित असल्याने अधिकाऱ्यांनी फायरिंग करून ड्रोन पाडण्याचे आदेश दिले. मात्र, काही मिनिटांतच हे ड्राेन गायब झाले. हेरगिरीच्या संशयावरून आर्टिलरीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास करून शनिवारी उपनगर पाेलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

काेकणातील बंदरावर जहाजात शस्त्रसाठा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच जवळ आलेल्या गणेशोत्सवामुळे राज्यात आधीच हाय अलर्ट दिलेला असताना ही घटना घडली आहे. लष्कर व पाेलिसांकडून संयुक्त तपास सुरू असून यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी देवळाली कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरी आणि गांधीनगर येथील काॅम्बॅक्ट आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्येही ड्राेन उडाल्याचा तसेच व्हिडिअाे शूटिंगचा प्रकार उघडकीस आला होता.

सैन्यदलाकडूनही स्वतंत्र चाैकशी या प्रकाराचा आता लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाकडून स्वतंत्र पथकाद्वारे तपास सुरू आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या क्षेत्रात ड्रोन किती वाजता घुसले व काेणत्या दिशेने बाहेर पडले याची सखाेल चाैकशी सुरू आहे. इतक्या संवेदनशील भागात ड्रोन घुसलेच कसे, हा प्रश्न आहे. लढाऊ वैमानिकांना दिले जाते प्रशिक्षण नाशिक- पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे आर्मी ट्रेनिंग कमांडअंतर्गत आर्मी एव्हिएशनच्या प्रशिक्षणार्थींना लढाऊ हेलिकाॅप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. त्याचबराेबर नजीकच्या परिसरात आर्टिलरी सेंटर म्हणजे ताेफखान केंद्रही असल्याने हा भाग अत्यंत संवेदनशील ठरतो.

चार पथकांद्वारे तपास सुरू : घटनेनंतर पोलिस उपायुक्त, सहआयुक्तांसह वरिष्ठांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रतिबंधित क्षेत्रालगत असलेल्या जय भवानी राेड, वडाळा गाव, गांधीनगर, उपनगर भागात चार पथकांद्वारे व गाेपनीय माहितीद्वारे चाैकशी सुरू आहे. वडाळा परिसरात काही कार्यक्रमानिमित्त ड्राेनचा वापर केला जाण्याचीही शक्यता आहे. - पंकज भालेराव, निरीक्षक, उपनगर पाेलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...