आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यवाही:सुरगाणा नगरपंचायतीतर्फे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण

सुरगाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपंचायतीमार्फत शहरातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या सर्व पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पथ विक्रेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधीला पथ विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानाचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाइल नंबर आदी माहिती द्यावी.

दि. ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत शहरातील पथ विक्रेत्यांनी पथ विक्रेता प्रतिनिधींकडे अथवा नगरपंचायत कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जे पथ विक्रेते कागदपत्रे मुदतीत जमा करणार नाहीत, त्यास नगरपंचायत जबाबदार राहणार नाही, असा इशारा दिला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे या सर्व पथ विक्रेत्यांचे व्यवसाय बुडाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...