आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याचे खासगी यंत्रणेकडून समपातळी सर्वेक्षण करून दि. ३० मेच्या आत राहिलेली कामे पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव कालव्याचे पाणी अद्यापपर्यंत डोंगरगावपर्यंत पोहोचू शकलेले नाही. जुलै २०१९ मध्ये पहिल्यांदा मांजरपाडा कालव्याचे पाणी दरसवाडी धरणात आले, तेव्हा पहिल्या प्रयत्नात मांजरपाड्याचे पाणी १३० किमी बाळापूरपर्यंत पोहोचले. जुलै २०२० मध्ये कोरोनामुळे प्रशासनाला कामे करण्यास अडचणी आल्या तरीही कातरणीपर्यंत पाणी पोहोचले. मात्र, चांदवड तालुक्यात कालव्याला पाण्याचा दाब वाढल्याने फुटला. जुलै २०२१ मध्ये मांजरपाडा धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे यावर्षीही पाणी कातरणीपर्यंत पोहोचले. नैसर्गिक अडचणी आल्या तरी कालव्यातून अपेक्षेप्रमाणे पाणी प्रवाहित होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहेत. पुणेगाव ते दरसवाडी व दरसवाडी ते डोंगरगाव असे स्वतंत्र कालवा तळ पातळी सर्वेक्षण खासगी यंत्रणेकडून तात्काळ करून घ्या, सर्वेक्षणात आढळून येतील त्या अडचणींवर १५ जूनच्या आत यांत्रिकी विभागाकडून काम करून घ्या, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
पुणेगाव १ ते २५ कालवा विस्तारीकरणासाठी दोन कोटी निधी मंजूर केला आहे. या कामातील संगमनेरे गावाजवळील अल्प प्रमाणात काम बाकी आहे. काम अपूर्ण राहिले तर दरसवाडीत पाणी २२० क्यूसेसने कसे प्रवाहित होणार असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित करताच ३० मेच्या आत सर्व कामे पूर्ण करून घेतो, असे मुख्य अभियंता संजय बेलसरे यांनी सांगितले. लेंडी नाला पाणी पूर्वीप्रमाणे भाटगाव नदीतून दरसवाडीत वळवने, खडकओझर ते दरसवाडी ८ किमी कालवा साफसफाई करणे, दरसवाडी येथील गेट तत्काळ नवीन बसविणे आदी कामाच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीस सर्व अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.