आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्योदयचे वाङ्मय अन् साहित्य पुरस्कार जाहीर:लक्ष्मीकांत देशमुख, फ.मु.शिंदे, सिसिलिया कार्व्हालो यांचा गौरव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख, कवी फ. मु. शिंदे, सिसिलिया कार्व्हलो यांना सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने देण्यात येणारे वाङ्मय व साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी केली. 11 हजार रुपये आणि गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वश्री प्रा. डाॅ. सदानंद मोरे, वसंत आबाजी डहाके, प्रा. डाॅ. विश्र्वनाथ शिंदे, प्रा. डाॅ. म. सु. पगारे, माया दिलीप धुप्पड, प्रा. बी. एन. चौधरी, ॲड. विलास मोरे, पीयूष नाशिककर, लिला शिंदे , कै. नागनाथ कोत्तापल्ले, स्व. कमलाकर देसले या निवड समितीने पुरस्कार्थींची निवड केली आहे.

सूर्योदय साहित्य पुरस्कार स्नेहलता त्र्यंबकअप्पा स्वामी (नांदेड) यांच्या गांधारी या कादंबरीला जाहीर करण्यात आला असून 2500 रपये व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर सूर्योदय वाड्.मय पुरस्कार स्वाती किशोर पाचपांडे (नाशिक) यांच्या बाई पणाच्या गोष्टी या ललित लेख संग्रहाला आणि सोलापूरच्या दीपक गायकवाड यांच्या पाणाड्या या कथासंग्रहाला सूर्योदय गझल पुरस्कार नांदेडच्या जयराम धोंगडे यांच्या शब्दाटकी, सूर्योदय काव्य पुरस्कार नाशिक येथील अनिल मनोहर यांच्या प्रकाशाचे नवे गाव, अकोल्याच्या दिनेश गावंडे यांच्या कंदिलाच्या लख्ख उजेडात या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. सूर्योदय काव्यरत्न पुरस्कार जळगावच्या उषा हिंगोणेकर यांच्या धगधगते तळघर या काव्यसंग्रहाला, चंद्रकांत चव्हाण यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या ललित लेख संग्रहाला सूर्योदय ललित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार मुंबई येथील रमेश तांबे यांच्या चिनूचे स्वप्न या बालकुमार कादंबरीला देण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा येत्या मार्चमध्ये नाशिकमध्ये होणार असल्याचे जैन यांनी सांगितले. यासाठी नाशिक जिल्हाध्यक्ष सावळीराम तिदमे, शहराध्यक्ष जनार्दन माळी, साहेबराव पाटील व कार्यकारिणी प्रयत्नशील आहे.

हे आहेत पुरस्कारार्थी

सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार : लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) व प्रा. फ. मु. शिंदे (औरंगाबाद) यांना

सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार: प्रा. डाॅ. प्रल्हाद लुलेकर (औरंगाबाद) यांना

सूर्योदय शब्ददीप पुरस्कार: प्रा डाॅ पी विठ्ठल (नांदेड) यांना

सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार: सिसिलीया कार्व्हालो (मुंबई) यांना

सूर्योदय साहित्य पुरस्कार: प्रा. डाॅ. संजीव गिरासे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...