आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पंचवटीतील कर्णनगर येथे ही कारवाई केली. चेतन यशवंत इंगळे (रा. मल्हारखाण झोपडपट्टी) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजारांचा गावठी कट्टा, दाेन जिवंत काडतूस जप्त केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असताना पथकाचे प्रजित ठाकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित कर्णनगर येथे गावठी कट्टा घेऊन आला असल्याचे समजले. पथकाने परिसरात सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये कमरेला लावलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक डाॅ. आंचल मुदगल, माणिक गायकर, सुनील माळी, शेरखान पठाण आदींनी ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.