आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेची सुरक्षा भेदून 17 लाखांची रोकड लंपास:संशयित सीसीटीव्ही मध्ये कैद; चोरीबाबत पोलिसांनी संशय केला व्यक्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँकेत असलेल्या सुरक्षा रक्षक आणि कॅशिअरच्या कॅबिनचे तीन दरवाजे उघडून भरणा केलेल्या रक्कमेतून तब्बल 17 लाखांची रोकड चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया पेठ शाखा येथे उघडकीस आला. पंचवटी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे प्रबंधक युवराज चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया पेठ नाका शाखा येथे बँकेचे कॅशिअर राजेंद्र बोडके यांच्या कॅशिअर कॅबिन च्या मागे टेबलवर बँकेत जमा झालेली रोकड ची बँग ठेवली होती. एका अनोळखी व्यक्तीने बँकेतत प्रवेश केला. बँकेत फिरत असतांना संशयिताने बँकेतील तीन दरवाजे उघडून कॅशिअरच्या कॅबिनचा दरवाजा उघडला.

टेबलवर ठेवलेल्या पैशांच्या पिशवीतून 17 लाखांची रोकड काढून घेत पोबारा केला. कॅशिअर बोडके भरणा करण्यास गेले असता रोकड मध्ये 17 लाखांची रोकड कमी असल्याचे निदर्शनास आले. प्रबंधक चौधरी यांना याबाबत कळवले. पंचवटी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी बँकेच्या सीसीटीव्ही तपासणी केली असता एक इसम सहजपणे कॅशिअर कॅबिन पर्यंत पोहचण्यासाठी तीन दरवाजे उघडून कॅबिन मधील टेबलवरील पिशवीतून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ निरिक्षक डाॅ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

चोरीबाबात शंका

स्टेट बँकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड चोरी झाल्याने या चोरीबाबात पोलिसांनी शंका उपस्थित केली. संशयित व्यक्तीला बँकेतील कॅबिन मध्ये जाण्यास सुरक्षा रक्षकाने रोखले का नाही. कॅशिअर कॅबिन पर्यंत जाण्यास तीन दरवाज्यातून जावे लागते. हे दरवाजे लाॅक का केले नाही याबाबत संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांचा तपास सुरू

संशयित सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत तो बँकेत गेला असावा. प्रबंधक कॅबिन, कॅशिअर कॅबिन कडे जात असतांना तो रक्षकासोबत बोलतांना दिसून येत आहे. या चोरीमध्ये बँकेतील कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...