आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोडपाठोपाठ पंचवटी विभागीय कार्यालयामध्ये ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सहा विभागीय कार्यालयातील विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेत रोज कार्यालयातील जमा-खर्चाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अपहार उघड झाल्यास विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे कर, परवाने, विकास शुल्क, रस्ता तोडफोड शुल्क विभागीय कार्यालयाकडून वसूल केले जातात.यासोबतच घरपट्टी व पाणीपट्टी देखील स्वतंत्ररित्या जमा केली जाते. कराचा भरणा केल्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत पावत्या संबंधितांना दिल्या जातात. मात्र त्यात काही कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचे बोलले जाते. पंचवटी विभागात रस्ता तोडफोड शुल्क आणि नळकनेक्शन देण्यासंदर्भात जमा झालेल्या रकमेच्या बनावट पावत्या आढळल्या असून या रकमेची नोंद संगणकात झाली नसल्याचे समोर आले आहे.
त्यात जवळपास ५० लाखांचा अपहार झाल्याचा संशय असून या पार्श्वभूमीवर प्रशासन उपायुक्त डॉ. मनोज घोडे-पाटील यांनी पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व व सिडकोच्या विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विभागीय कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्यासह दररोज होणाऱ्या जमा-खर्चाचा आढावा घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशाप्रकारच्या घटना घडल्या तर विभागीय अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.