आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:जखमांवरून खुनाचा संशय; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

सिडको21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खून, खुनाचा प्रयत्न व लुटमारीच्या घटनांचे सत्र सुरूच असताना सिडकोतील रहिवासी आणि तिबेटीयन मार्केटमध्ये चायनीज खाद्यपदार्थ विक्रेता असलेल्या कैलास बाबुराव साबळे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास उघडकीस येताच परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. साबळे यांचा खून झाला की अकस्मात मृत्यू याचा अंबड पोलिस तपास करीत असून त्रिमूर्ती चौकातील डॉ. हेडगेवारनगर येथे साबळे यांचा राहत्या घरातच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यासंदर्भात, अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिबेटीयन मार्केट येथे गेल्या अनेक वर्षांपासून चायनीज खाद्यपदार्थाचा गाडा लावून हाॅटेल चालविणारे कैलास साबळे (४५) यांच्या पत्नीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, रात्री दीड वाजेच्या सुमारास पती साबळे हे घरी आले. त्यांचा मित्र पिंटू गायकवाड याने त्यांना घरी आणून सोडले.

शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्टता
या घटनेत प्रथमदर्शनी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. साबळे यांच्या शरीरावर हाणामारीच्या जखमा दिसत असल्या तरी कोणी तक्रारीसाठी पुढे आलेले नसून पोलिस सर्व दिशेने तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून शोध सुरू : साबळे याच्या शरीरावरील जखमा लक्षात घेता व पत्नीने दिलेल्या माहितीनुसार मित्र घरी सोडायला आला होता, त्या मित्राची सखोल चौकशी पोलिस करीत असून आणखी सोबत कोण होते? कुठल्या कारणावरून त्यांच्यात हाणामारी झाली की नाही? यांसह घरी आला तो मद्याच्या नशेत होता की काय? यासह मध्यरात्री त्याला घरी आणताना कोणी बघितले का? परिसरात कुठे सीसीटीव्ही कॅमरे असतील तर त्याचे फुटेज देखील पोलिस तपासत असल्याचे सांगण्यात आले.

सिडको परिसरात तणाव
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत उद्योजकाच्या खुनाच्या घटनेनंतर वारंवार प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत असूनही पोलिस यंत्रणेचा वचकच राहिला नसल्याचे चित्र आहे, त्यातच साबळे यांच्या मृत्यूचे वृत्त परिसरात पसरताच त्याच्या मित्रांसह कुटुंबीय, नातलगांनी राहत्या घरी हेडगेवार चौकात गर्दी केली. टोळक्याच्या हल्ल्यात त्याचा खून झाल्याच्या चर्चेने तणाव वाढत गेला. तर त्याचवेळी काहींनी कौटुंबिक कारणातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा होती. पोलिसांनी गर्दी पांगवल्याने तणाव काहीसा कमी झाला. साबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

बातम्या आणखी आहेत...