आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंस्त्र कुत्र्यांना पकडण्याबाबत टोलवाटोलवी:नाशिक शहरात वर्षभरात 9279 श्वानांची नसबंदी कागदाेपत्री बिले काढल्याचा संशय

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात श्वान निर्बीजीकरणाचे काम बंद - Divya Marathi
शहरात श्वान निर्बीजीकरणाचे काम बंद

गेल्या 14 वर्षापासून नाशिक शहरात श्वान निर्बीजीकरणासाठी काेट्यवधी रूपये खर्च झाल्यानंतरही कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येत नसल्याचे दुर्दवी चित्र आहे. दरम्यान, सध्यस्थितीत नवीन ठेक्यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे श्वान निर्बीजीकरणाचे कामच बंद झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

दुसरीकडे, गेल्या अर्थिक वर्षात 9279 श्वानांची नसबंदी केल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला असून त्यापाेटी थाेडथाेडका नव्हे तर 60 लाख 31 हजाराचा खर्चही केला आहे. दरम्यान, हिंस्त्र श्वानांबाबत तक्रारी आल्यानंतर माेकळी जागा असल्यामुळे पकडण्यात अडचणी येत असल्यासारखे मुद्दे उपस्थित करून कामकाजाकडे टाळाटाळही हाेत आहे.

महापालिका क्षेत्रात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने कंत्राटी तत्वावर 2007 पासून श्वान निर्बिजीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ झाला. गेल्या 15 वर्षात एक लाखाहून अधिक भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

8 एप्रिलपासून श्वान पकडण्याच्या ठेक्याची मुदतच संपली आहे. नवीन निविदा काढली असली तरी, दाेनवेळा प्रतिसाद मिळालेला नाही. एक वर्ष अनुभव असण्याच्या अटीची अडचण असून ही बाब लक्षात घेत, तिसऱ्या निविदेत जर एखादा ठेकेदार समाेर आला नाही तर अनुभवाची अट शिथिल करून फेरनिविदा काढली जाण्याची शक्यता आहे.

श्‍वान निर्बीजीकरण

मध्यंतरी कागदाेपत्री श्वान निर्बीजीकरण दाखवून पैसे काढले जात असल्याच्या संशयाला पुष्टी देणारे ताशेरे प्रत्यक्ष पाहाणीनंतर जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीने ओढले हाेते. त्यावेळी निर्बिजीकरण केंद्र परिसर तसेच वॉर्डात अस्वच्छता तसेच दप्तर तपासणीतही अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.

भटकी कुत्री पकडणे, त्यांना रेबीज लस देणे, औषधसाठा यासंदर्भातील नोंदवही अपूर्ण असणे, निर्बिजीकरण रजिस्टर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर श्वान पुन्हा मूळ जागेत सोडणे, शस्त्रक्रिये दरम्यान कुत्र्यांचा झालेला मृत्यू, यासंदर्भातील नोंदी समितीला आढळून आल्या नाहीत. श्वानांना अपुरे खाद्य पुरविले जात असल्याचेही समाेर आले हाेते. मात्र त्यानंतरही पशुसंवर्धन विभागावर काेणतीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नव्हती. आताही तशीच परिस्थीती असून एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत साडे चार हजार नर तर 4779 मादी याप्रमाणे 9279 श्वान पकडल्याचे दाखवले आहे. प्रतिश्वान निर्बीजीकरणासाठी 650 याप्रमाणे 60 लाख 31 हजार रूपये देण्यात आले आहे.

सध्या श्वान पकडण्याचे काम बंद

पशुवैद्यकीय विभाग अधिकारी डाॅ प्रमाेद साेनवणे,​​​​​​ म्हणाले की, शहरातील श्वान निर्बीजीकरणासंदर्भात येत असलेल्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली जाईल. जुन्या ठेक्याची मुदत 8 एप्रिल राेजी संपली असून लवकरच नवीन निविदेद्वारे ठेकेदार नियुक्त हाेईल. जुन्या ठेकेदारास मुदतवाढ दिलेली नाही.