आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवार पेठेत होलसेल गुळाची विक्री करणाऱ्या राजेश ट्रेडींग कंपनीत भेसळीच्या संशयावरून सोमवारी (दि. १३) अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून २ लाख ४० हजार ४८० रुपये किमतीचा ३००६ किलो गुळ जप्त केला आहे. अनेक किरकोळ विक्रेते होलसेल व्यापाऱ्यांकडून गुळ खरेदी करून त्याची सेंद्रिय गुळ म्हणून विक्री करतात. गुळाची विक्री करण्यासाठी शहरात येणाऱ्या महामार्गांवर ठिकठिकाणी चारचाकी वाहनातून गुळाची विक्रीही होताना दिसते.
गुळामध्ये रंग टाकून भेसळ केली जात असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख यांच्या पथकाने रविवार पेठेतील राजेश ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून गुळ जप्त केला आहे. जप्त केलेला गुळ संबंधित कंपनीतच सील करण्यात आला असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी रासकर यांनी दिली. नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.
झुरळ आढळल्याने हॉटेल व्यावसायिकास नोटीस
शहरातील अनेक हॉटेल्समध्ये व्यवस्थित स्वच्छता केली जात नसल्याने अन्नपदार्थांमध्ये झुरळ निघत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी कॉलेजरोडवरील कृष्णा व्हेज डिलाइट या हॉटेलची तपासणी केली असता हॉटेलच्या स्वयंपाक घरात अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे संबंधित व्यावसायिकास सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील सर्वच हॉटेल्सची अचानक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व आैषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.