आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कटरने चिरला गळा, पतीचीही आत्महत्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कटरने पत्नीचा गळा चिरून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने भेदरलेल्या पतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजता म्हसरुळ शिवारातील रामकृष्णनगर येथे उघडकीस आला. राजीव रतनसिंग ठाकूर (५०) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामकृष्णनगर येथील लक्ष्मी रेसिडेन्सी या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राजीव ठाकूर हे पत्नी संध्या राजीव ठाकूर (४५) व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. सायंकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पेपर कापण्याच्या कटरने पत्नीच्या गळ्यावर वार केला. गळ्याची नस कापल्याने रक्ताची धार उडाल्याने पत्नी जागेवर कोसळली.

पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पतीने देवघराच्या गॅलरीमध्ये जाऊन खाली उडी घेतली. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. इमारतीमधील नागरिकांना घटना समजताच त्यांनी ठाकूर कुटुंबियांच्या फ्लॅटकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संध्या ठाकूर यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. म्हसरुळ पोलिस ठाण्यात मयत राजीव ठाकूर यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उपआयुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दाम्पत्याला दोन मोठी मुले
ठाकूर दाम्पत्याला २५ आणि २३ वर्षांची दोन मुले आहेत. ठाकूर हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. यापूर्वी दोघांमध्ये वाद झाले होते. घटनेच्या वेळी दोन्ही मुले बाहेर गेल्याची संधी साधत पतीने पत्नीवर हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वत: इमारतीहून उडी घेत आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...