आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदगुरु मोरेदादा रुग्णालय शिलान्यास सोहळा:स्वामी समर्थ गुरुपीठचे चंद्रकांतदादा मोरे आणि डॉ दीकपाल गिरासे यांनी फडणवीसांची घेतली भेट

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 21 जून रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सद्गुरु मोरेदादा रुग्णालयाचा शिलान्यास आणि योग दिन साजरा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे समर्थ गुरुपीठात येत आहेत. या सोहळ्याबाबत आमंत्रण देण्यासाठी स्वामी समर्थ गुरुपीठचे चंद्रकांतदादा मोरे आणि डॉ दीकपाल गिरासे यांनी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.

यावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन राष्ट्रीय एकोपा वृद्धिंगत करण्याचे कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

तसेत फडणवीस यांनी कार्यक्रमास निश्चित उपस्थित राहण्याचे आश्वासन यांनी दिले. योगादिन कार्यक्रमास देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात सेवा मार्गाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्यांची माहिती देण्यात येणार आहे.

शिलान्यास आणि योगदिन सोहळ्यात उपस्थितीसाठी सेवा मार्गाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, माजी मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री दादा भुसे, समजाकल्यान व न्याय विकास मंत्री धनंजय मुंढे, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांचेसह अनेक मंत्र्याना आमंत्रित करण्यात आले. या सोहळ्यासाठी भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ही निमंत्रित करण्यात आले. याप्रसंगी सेवा मार्गाच्या उपक्रमाची माहिती मंत्र्यांना देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...