आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा खेळखंडाेबा:स्वामी समर्थनगर 30 तासांपासून अंधारात; वीज कंपनीवर तीव्र राेष

इंदिरानगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी फाटा परिसरातील स्वामी समर्थनगर, गजानन महाराज कॉलनी, दामोदर चौक परिसर तसेच इंदिरानगरातील कलानगर चाैफुली ते पाथर्डी गाव चाैफुली या दरम्यान साेमवारी (दि. १) सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला हाेता. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. २) सायंकाळपर्यंत काही ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने तब्बल ३० तासांहून अधिक काळ परिसरातील नागरिक अंधारात हाेते. गणेशाेत्सव, नवरात्राेत्सवापासून ते दिवाळी सणाच्या काळातही याच भागात वारंवार विजेचा खेळखंडाेबा हाेत असल्याने रहिवासी संतप्त झाले असून वीज कंपनीच्या भाेंगळ कारभाराविराेधात आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

स्वामी समर्थ केंद्राजवळील डीपीजवळील वायर तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे सुरुवातीला वीज कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाथर्डी उपकेंद्र येथे ३३ केव्हीच्या कामासाठी सर्व वाहिन्यांचा वीजपुरवठा सायंकाळी ३ तास खंडित केला हाेता. त्याचवेळी इतरही भागात वीजपुरवठा खंडित झाला हाेता. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने स्थानिकांनी वीज अधिकाऱ्यांना भेटून आंदाेलनेही केली. मात्र, त्याचा काहीही उपयाेग झाला नाही. दिवसा व रात्रभर महिलांना वीज नसल्याने अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. वीज देयकात कपात करण्याची मागणी तक्रार निवारण समिती जिल्हाध्यक्ष संदीप जगझाप यांनी केली. वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे. अभियंता वारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फाेनच उचलत नसल्याचे सांगण्यात आले.

आता आंदाेलनाचा पवित्रा
ऑगस्ट महिन्यापासून या भागात विजेचा हा लपंडाव सुरू आहे. तब्बल ३० तासांपेक्षा अधिक काळापासून स्वामी समर्थ केंद्र, गजानन महाराज कॉलनी व इतर भागातील वायर तुटल्याने परिसर अंधारात आहे. आता आम्ही आंदाेलनाच्या तयारीत आहाेत. - सुभाष महाले, ग्राहक

बातम्या आणखी आहेत...