आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकच्या स्वराज्य परिवाराच्यावतीने यंदा भारतीय अमृत महोत्सवी निमित्ताने स्वराज्य नासिकरत्न, समाजभूषण तसेच आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक म्हणून एकुण 75 जणांना 'राज्यस्तरीय पुरस्काराने' गौरवण्यात आले. तर यावेळी प्रामुख्याने क्रांतिवीर राघोजी भांगरे, जननायक बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक स्मारकाची उद्घघोषणा करण्यात आली.
म्हसरूळ येथे आयोजित या कार्यक्रमास पाहुणे म्हणून जागतिक शास्त्रज्ञ डॉ. रामदास डामसे, केंद्रीयमंत्री डॉ. भारतीताई पवार यांचे स्वयंसचिव रुपेश शिरोळे, शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम, स्टार 24 फास्ट न्यूजच्या संचालिका सुनिता पाटील, केशवराव गायकवाड, प्रभाकर रायते,विनायक सुर्यवंशी,समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक,माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे,कविता कर्डक, सुभाष खैरनार महाराज, रूंजाआप्पा मोराडे, विष्णूपंत सातकर, अशोक मोराडे, केशव काळे, नगरसेवक सागर उजे, प्रकाश उखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्यावतीने स्वराज्य परिवारकडून क्रांतिवीर राघोजी भांगरे व जननायक बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक स्मारकाची उद्घघोषणा घोषणा करण्यात आली. स्वराज्य परिवारकडून प्रारंभी सर्व राष्ट्रीय थोर पुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणाने पूजन झाले. नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात बोलतांना म्हटले की, स्वराज्य परिवारकडून विविध क्षेत्रात तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना यथोचित सन्मानित केले जाते. ही कौतुकास्पद बाब आहे. खरंतर स्वराज्य परिवार ही सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या मातीत शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य व विविध क्षेत्रात कार्यरत असून प्रतिवर्षी हा सोहळा दिमागदार पद्धतीने केला जातो.
यातून महापुरुषांचा विचार व संस्कार सर्व समाज बांधवांना देण्याचे कार्य होत असल्याचे मान्यवरांनी शेवटी व्यक्त केले. नावाने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
याशिवाय *स्वराज्य नासिक रत्न पुरस्कार. सूर्यकांत राळकर, डॉ.मोतीलाल तायडे, राष्ट्रीय संत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, डॉ. वैज्ञानिक रामदास डामसे,रा जयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी, पोलीस अधिकारी सदाशिव भडीकर,प्र भाकर रायते,मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया,छावाचे नितीन रोठे पाटील,वृषाली शेख,विनायक सूर्यवंशी आदींना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वराज्य नासिकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजभूषण पुरस्कारामध्ये प्रामुख्यान जेष्ठ समाजसेवक प्रकाश उखाडे,गणेश पेलमहाले,सुनील निरगुडे,सुनील परदेशी, अमित घुगे, विशाल वारुळे,राजुभाऊ जाधव, श्याम पिंपरकर, अनिता गवळी, चंद्रमनी पटाईत, मयूर पाटील, विनोद बिरारी, मनोज शिरसाठ, स्वप्निल जाधव, रोहिणी कुमावत, विजय निपाणेकर, दीपक मंडलिक आदींना सन्मानित करण्यात आले.
आदर्श मुख्याध्यापक प्रियंका निकम, पुष्पा वडजे, रंजना कदम, सुरेश लिलके, संजय अहिरे, नानासाहेब निकम, भारती पाटील, भागवत सूर्यवंशी, सुनीता जाधव, उत्तम झिरवाळ, प्रकाश देशमुख, जिजा खाडे, अनिल ठाकरे, रतन चौधरी, माधव चौधरी, वैशाली गाजरे आदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.