आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा:नाशिकच्या स्वराज्य परिवारकडून रविवारी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्य परिवाराच्या वतीने क्रांतिवीर राघोजी भांगरे व जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्रातील पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा-2022 यावर्षी म्हसरूळ येथे रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

स्वराज्य परिवारचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व जननायक बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक स्मारकाचे उद्घोषणा केली जाणार आहे.

हा कार्यक्रम रविवार, 4 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता,श्रीहरीकृपा लॉन्स,दिंडोरीरोड,म्हसरूळ,नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार,माजी उपमुख्यमंत्री ना.छगनराव भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर,पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी,ज्येष्ठ नेते माझी आमदार बाळासाहेब सानप, एड.मुंबई उच्च न्यायालयाचे चेतन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर,ना.ए.सोचे सचिव राजेंद्र निकम आदी विविध प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी पुरस्कारार्थी यांच्या समवेत नागरीकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन तथा स्वराज्य परिवारचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे,वाल्मीक शिंदे,सौ.रेखा नेहरे,प्रकाश उखाडे,मोहिनी भगरे,शरद बस्ते,किरण सुर्यवंशी,शांताराम नेहरे,सोमनाथ बर्डे, आकाश बकुरे,मयूर पाटील,विद्याताई शिंदे आदी पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

स्वराज्य परिवाराकडून दरवर्षी राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची निवड केली जाते त्यांना पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमात देखील राज्यभरातील उत्कृष्ट शिक्षकांचा सामाजिक क्षेत्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधींचा गौरव केला जाणार आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचे आद्य जनक क्रांतिकारक राघोजी भांगरे व जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचं घोषणा केली जाणार आहे त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणे बाबत माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमास वेगळे ठरणार असून राज्यभरातील आदिवासी बांधव कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...