आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज्य संघटनेचा आक्रमक इशारा:हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित केल्यास वाहिनीच्या स्टुडीओ फोडणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची माेडताेड करण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी हा चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून सबंधित वाहिनीस पत्र दिले हाेते. असे असतानाही 18 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची जाहिरात सबंधित वाहीनीकडून सुरूच आहे. हा चित्रपट प्रदर्शित केल्यास सबंधित वाहिनीचा स्टुडीओ फाेडणारच असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी अंकुश कदम व विनोद साबळे यांनी सबंधित वाहीनीच्या स्टुडीओत प्रत्यक्ष जाऊन चित्रपट प्रदर्शित करू नये याबाबत व्यवस्थापनाशी संविधानिक मार्गाने चर्चा केली. यानंतर चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ज्याअर्थी त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, त्याअर्थी या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दर्शविल्याचे व वादग्रस्त सादरीकरण केल्याचे एकप्रकारे मान्यच केलेले आहे. तथापि, संपूर्ण चित्रपटाच्या सादरीकरणावरच आमचा आक्षेप असून, तसेच नेमका कोणता भाग वगळणार याची स्पष्टता नसलेने, स्वराज्य संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम सबंधित वाहिनीला भोगावे लागतील. सिनेमेटीक लिबर्टीच्या नावाखाली शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड आम्ही सहन करणार नाही. वारंवार सांगुनही समजत नसेल तर स्टुडीओ नक्की फोडणारच असा इशारा गायकर यांनी दिला आहे. हर हर महादेव हा चित्रपट टीव्हीवर दाखवणे महाराष्ट्रातील शिवप्रेमी व स्वराज्य संघटना सहन करणार नाही. त्यामुळे संबंधित वाहिनीने हा खोडसाळपणा करू नये अशी मागणी संघटनेने केली आहे.

दरम्यान संबंधित वृत्तवाहिनी चित्रपट प्रदर्शित करेल याची खात्री असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुप्त बैठकांवर भर दिला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास कशाप्रकारे आंदोलन करायचे व स्टुडिओ पर्यंत गनिमी कावा करत पोहोचण्याचे नियोजन केले जात असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्टुडिओ फोडणारच या इशाऱ्यामुळे पोलिस यंत्रनाही सतर्क झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...