आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:जैन एकता मंचतर्फे 360  मुलांना स्वेटर

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतमजुरांच्या मुलांना स्वेटर वाटप करत जैन एकता मंचने मदतीचा हात दिला. ओझरजवळील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या २१० गरजू मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले. दिंडोरीजवळील पिंपळनारे येथील १५० मुलांनादेखील स्वेटर देण्यात आले.

जैन एकता मंच व काही सखी सदस्यांच्या आर्थिक सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे सोनाली क्षीरसागर या मंचच्या सदस्या नसूनसुद्धा त्यांनी या सामाजिक उपक्रमात आपले आर्थिक योगदान दिले. संस्थापिका मंगला घिया यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा शिल्पा चोरडिया यांच्या मेहनतीने आतापर्यंत सुमारे ३६० स्वेटरचे वाटप करण्यात आले.

जानोरी शाळेतील शिक्षिका मनीषा गायकवाड यांची स्वेटरची इच्छा जैन एकता मंचने पूर्ण केल्यामुळेच त्यांनी मंचला धन्यवाद दिले. जैन एकता मंचच्या सदस्या पौर्णिमा सराफ, सुरेखा कांकरिया, आरती चोरडिया आदी उपस्थित हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...