आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन एकता मंचच्या वतीने आदिवासी पाड्यांवरील तीन शाळांत तब्बल ४३२ स्वेटरचे वाटप गरजूंना करण्यात आले. त्यामुळे गरजंूना कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब मिळाली.महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जैन एकता मंचची स्थापना करण्यात आली आहे. मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम राबवत मदतीचा हात दिला जाताे. गेेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. अशा वातावरणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थंडीचा सामना करत शाळेत जावे लागते.
या थंडीमुळे त्याचा आराेग्यावर देखील परिणाम हाेत असताे. मात्र अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते थंडीचा बचावासाठी स्वेटर घेऊ शकत नाही.याच पार्श्वभूमीवर जैन एकता मंचने केला वरखेडा शाळेतील व सखी सदस्यांच्या सहकार्याने जि.प. प्राथमिक शाळा वरखेडा येथील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. वरखेडा शाळेतील ७२ विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर मुलांना बिस्किटे, खाऊ देऊन त्यांचे तोंडही गोड करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणाऱ्या जैन एकता मंचच्या सर्व सदस्यांना शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांकडून खूप खूप धन्यवाद देण्यात आले. शाळेतील शिक्षक सतीश बर्डे यांनी जैन एकता मंचचे कार्य व राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या दातृत्व भावनेतून आपण हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापिका अमिता सोनवणे, शिक्षिका सीता भोये, प्रतीक्षा मोंढे, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी पाड्यावर जैन एकता मंचतर्फे यापूर्वीदेखील उपक्रम राबविले गेल्याने गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
समाजोपयोगी कामाने निर्माण केला आदर्श
महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने जैन एकता मंचची स्थापना करण्यात आली. मंचच्या वतीने महिलांसाठी आराेग्य तपासणीसह विविध शिबिरांचे आयाेजन केले जाते. सामाजिक दायित्व जपत वंचित, निराधारांनादेखील मदत केली जातेे.
मदतीचा हात देण्याचा अनाेखा प्रयत्न
थंडीपासून मुलांचा बचाव व्हावा या उद्देशाने स्वेटर वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून मुलांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमासाठी जैन एकता मंचच्या सर्वच सदस्यांची माेठी मदत हाेत असते.- शिल्पा जैन,अध्यक्ष, जैन एकता मंच
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.