आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरला लुटले!:तलवार, कोयताने प्राणघातक हल्ला; बिटको चौकातील घटना, डाॅक्टरांमध्ये संताप

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे अपघातात जखमी झालेल्याला रुग्णालयात पोहचवण्यासाठी गेलेल्या 108 या आपत्तकालीन शासकीय रुग्णवाहिकेच्या डाॅक्टरला 5 हल्लेखोरांना बेदम मारहाण करत तलावारीचा धाक दाखवत लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. 9) रोजी रात्री 11 वाजता बिटको परिसरात उघडकीस आला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले, या प्रकाराने रुग्णवाहिकेवरील डाॅक्टरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि डाॅ. ओंकार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या 108 रुग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी आहेत. रात्री 11 वाजता बिटको हाॅस्पिटल परिसरात रुग्णवाहिकेत असताना रेल्वे अपघातात जखमी झालेल्याला रुग्णालयात पोहचवण्याबाबत त्यांना काॅल आला. तेथे जाण्यासाठी फोनवरुन पुणे येथील नियंत्रण कक्षाकडून माहिती घेत असताना दोन दुचाकीहून आलेले चौघे जण रुग्णवाहिकेजवळ आले. संशयितांना हातातील मोबाईल हिसवण्याचा प्रयत्न केला. डाॅ. पाटील यांनी प्रतिकार केल्याने चौघांपैकी एकाने हातावर कोयता मारला.

जखमी झाल्यानंतर संशयितांनी मारहाण केली तीघांना पकडून ठेवत एकाने बळजबरीने खिशातून 3 हजारांची रक्कम काढून घेतली. डाॅ.पाटील यांनी आरडाओरड केल्यानंतर संशयित दुचाकीहून पसार झाले. डाॅ. पाटील यांना त्यांचे सहकारी आणि रुग्णवाहिका चालकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध सुरु केला. रात्रीची वेळ असल्याने संशयित नेमके कुठल्या दिशेला गेले ते समजले नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी सुरु केली आहे. वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

डाॅक्टरांमध्ये दहशत

रात्र पाळीत रुग्णवाहिकेवर कर्तव्य बजावणाऱ्या डाॅक्टरांमध्ये या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी असुरक्षेतची भावना रुग्णवाहिकेवरील डाॅक्टरांमध्ये आहे. रुग्णवाहिकेवरील डाॅक्टरांना मारहाण करणे निंदनीय आहे. अशा अपप्रवृत्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. रात्रीच्या वेळी आपत्कालीन मदतीसाठी 108 रुग्णवाहिका कायम तत्पर असते. मात्र या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. -डाॅ. अश्विन, व्यवस्थापक आपत्तकालीन रुग्णवाहिका

बातम्या आणखी आहेत...