आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय विभाग:नाशकातही गाेवरची 4 बालकांमध्ये लक्षणे ; धोका वाढण्याची शक्यता

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतत बालकांमध्ये गाेवरची संख्या वाढत असताना आता नाशकातही चार बालकांमध्ये लक्षणे आढळली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईस्थित हाफकीनच्या प्रयाेगशाळेत पाठविले असून त्याचे अहवाल प्राप्त हाेताच शहरात बालकांची स्वतंत्र तपासणी माेहीम राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही आता गोवरचा धोका वाढण्याची शक्यता वैद्यकीय विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. मुंबईत गोवरचे रुग्ण वाढले असून या आजारामुळे काही मुले ही व्हेंटिलेटरवर गेली आहेत. गोवर हा विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. मुंबईत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशकातही पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील काही भागांमध्ये केलेल्या तपासणीत गोवरचे लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण आढळले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डा.बापूसाहेब नागरगाेजे यांनी सांगितले. संसर्गजन्य कक्ष कार्यान्वित : शहरात संशयित बालके आढळून येताच मनपा वैद्यकीय विभागाने या आजाराचा मुकाबला करण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य कक्ष तयार ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...