आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • T20 Maharashtra Gets Off To A Winning Start Under Ishwari Savkar; Won Both The First Matches Against Mizoram And Kerala In The Tournament

महिला टी-20:ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विजयी सुरुवात; स्पर्धेत मिझोराम व केरळ विरुद्ध पहिले दोन्ही सामने जिंकले

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित, चंदिगड येथे 19 वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील मिझोराम व केरळ विरुद्ध असे पहिले दोन्ही सामने जिंकले.

40 धावांचे जोरदार योगदान

पहिल्याच सामन्यात महाराष्ट्र संघाने मिझोराम वर 93 धावांनी दणदणीत विजय मिळविला. ईश्वरी सावकारने सलामीला येत केवळ 39 चेंडूत 6 चौकारांसह 40 धावांचे जोरदार योगदान दिले. कर्णधारपद निभावताना संघातर्फे सर्वाधिक धावा केल्या. तेराव्या षटकात ईश्वरी धावबाद झाली तेव्हा संघाची धावसंख्या 93 पर्यंत नेऊन ठेवली होती.

केरळला 86 धावात रोखले

विजयासाठी 132 धावांचा पाठलाग करताना मिझोरामला महाराष्ट्र संघाने केवळ 38 धावात गुंडाळले. तर दुसर्‍या सामन्यात केरळ वर 11 धावांनी विजय मिळवतानाही ईश्वरीने 5 चौकारांसह सर्वाधिक 41 धावा केल्या. महाराष्ट्र संघाने 4 बाद 97 ची मजल मारली व केरळला 86 धावात रोखले.

संक्षिप्त धावफलक व निकाल :

महाराष्ट्र वि मिझोराम - मिझोराम ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

महाराष्ट्र - 20 षटकांत 5 बाद 131 - ईश्वरी सावकार 40, श्वेता सावंत 28. वि.

मिझोराम - 16.4 षटकांत सर्वबाद 38. इशिता खळे 3 बळी.

महाराष्ट्र 93 धावांनी विजयी.

महाराष्ट्र वि केरळ - केरळ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

महाराष्ट्र - 20 षटकांत 4 बाद 97 - ईश्वरी सावकार 41. के एन मुल्ला नाबाद 25. वि.

केरळ - 20 षटकांत सर्वबाद 86. के एन मुल्ला 3 तर समृद्धी बनवणे व इशिता खळे प्रत्येकी 2 बळी.

महाराष्ट्र 11 धावांनी विजयी.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित, चंदिगड येथे 19 वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे एफ गटातील बाकीचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – 4 ऑक्टोबर - वडोदरा, 6 ऑक्टोबर - माणिपूर व 8 ऑक्टोबर - हरियाणा. यापुढील सामन्यात देखील सगळ्यांना महाराष्ट्र संघाकडून चांगल्या कामगिरिची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...