आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर पोलिसांनी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांकडे 2 गावठी कट्टे आणि 3 जीवंत काडतुसे आढळले. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (ता. 17) रोजी पहाटे भगूर विजयनगर येथे ही कारवाई केली. सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. टोळी घातपात करण्याच्या उद्देशाने जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रशांत नानासाहेब जाधव, अतिष कैलास निकम, सागर किसन कोकणे, रोहन संजय माने, रहेमान जाफर शेख, गौरव बाळासाहेब फडोळ अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शस्त्र प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर शहरात कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक भगूर विजयनगर परिसरात गस्त करीत होते. एका हाॅटेल परिसरात पाच ते सहा संशयित गावठी कट्टे घेऊन जमा झाले असून काही तरी घातपात करण्याचा उद्देश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पथकाने परिसरात सापळा रचला संशयितांना चारही बाजुने घेरत ताब्यात घेतले.
अंगझडतीमध्ये दोघांच्या कमरेला दोन गावठी कट्टे त्यात 3 जीवंत काडतूस आढळून आले. वरिष्ठ निरिक्षक कुंदन जाधव, डिबी पथकाचे राहुल मोरे, प्रकाश गिते, संदेश पाडवी, लियाकत पठाण, वैशाली मुकणे, बाळकृष्ण गांगुर्डे, सुनिल जगदाळे, भाउसाहेब ठाकरे, श्याम कोटमे, सुभाष जाधव, चंद्रभान भोईर, एकनाथ बागुल, नितीन करवंदे यांच्या पथकाने उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
परराज्यातून आणली हत्यारे
संशयित तडीपार काळात शहरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातून गावठी कट्टे मागवल्याचे निष्पन्न झाले आहे. कट्टे पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.