आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने 24 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवळा पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. हर्षल संजय गायकवाड (वय 24, रा. विठेवाडी रोड विद्यानगर,देवळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव नाहे.
मयताचे वडील संजय हरी गायकवाड यांनी देवळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण सदाशिव आहेर रा. तिसगाव ता.देवळा आणि अमोल निकम रा.दाभाडी ता.मालेगाव यांच्याकडून 21 लाख रुपये हे उसने घेतलेले आहेत. त्यापोटी फिर्यादी संजय गायकवाड यांनी दोघांना तिन धनादेश दिलेले होते.
21 लाखांसाठी धमक्या
सदरचे तिन्ही धनादेश फिर्यादीचे खात्यावर पैसे नसल्याने बाउन्स झाले, त्यामुळे संशयित दोघा आरोपीचे उसने दिलेली रक्कम परत मिळू शकली नसल्याने त्यांनी सतत फिर्यादीचा मुलगा हर्षल गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईल वरुन व व्हॉटस अप संदेशाद्वारे मयत हर्शल यास सतत आम्ही तुझी जिंदगी बर्बाद करून टाकू, कोणीही अधिकारी आमचे वाकडे करु शकत नाही सर्व आमचे खिशात आहेत. आम्ही तुझे हातपाय तोडून टाकू " असे बोलून व संदेश पाठवून हर्शल यास जगणे असहय केल्याने हर्शल संजय गायकवाड याने शनिवारी दि.19 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्याचे राहते घरात कोणी नसतांना घरामधील बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन घरातील छताला पडदयाचा कपडा गुंडाळून बांधून त्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रवीण सदाशिव आहेर रा. तिसगाव ता.देवळा आणि अमोल निकम रा.दाभाडी ता.मालेगाव यांच्याविरोधात कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असूला संशयित आरोपी प्रवीण आहेरला पोलिसांनी अटक केली आहे तर अमोल निकम रा.दाभाडी ता.मालेगाव हा फरार आहे.
पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे,चंद्रकांत निकम,पोलिस नाईक ज्योती गोसावी आदी करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.