आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:घरात एकटी असल्याचा घेतला फायदा; संशयितावर गुन्हा दाखल

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच नाशिक शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार अंबड परिसरातील दत्तनगर येथे उघडकीस आला. याप्रकरणी संशयित अल्पवयीन आरोपी विरोधात अंबड पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कलम सह बलात्काराचा गुन्हा मंगळवारी (06 सप्टेंबर) दाखल करण्यात आला आहे.

जबरदस्तीने केला अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ( 4 सप्टेंबर रविवारी ) रोजी दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या संशयित आरोपी याने घरात घुसून बळजबरीने आपल्या घरी घेऊन जात पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केले. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कलम सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

घटनेने परिसरात खळबळ

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिला मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेचा गुन्हा दाखल होताच संशयित फरार झाला असून त्याच्या मागावर पोलिसांनी वेगळे पत्र पाठवले आहेत. अंबड परिसरात शेजारी राहणाऱ्या तरुणानेच घरात खेचत नेऊन बलात्कार केला आहे. घटना घडली त्यावेळी मुलगी घरात एकटी होती. याचाच फायदा घेत संशयितांने तीला बळजबरीने शेजारीच असलेल्या त्याच्या घरात घेऊन गेला व मुलीच्या इच्छेविरोधात अत्याचार केला. महिन्याभरात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे सिडको परिसरात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एकटी असल्याचा घेतला फायदा

तरुणीच्या मनाविरुद्ध हात पकडून, खेचत स्वतःच्या घरी घेऊन गेला. तीला दमदाटी करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेच्या पालकांना माहिती मिळताच त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान अंबड पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...