आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:अर्थमंत्री अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मीही येईन : मंत्री नितीन राऊत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पदोन्नती उपसमितीच्या कामकाजावर काँग्रेस बैठकीत नाराजी

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही मोर्चात सहभागी होईन, असे आवाहन ऊर्जामंत्री व विदर्भातील काँग्रेस नेते डाॅ. नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या कार्यकर्त्यांना केले.

वीजमाफीवरून डॉ. राऊत व अजित पवार यांच्यातील शीतयुद्ध आता “रस्त्या’वर उतरण्याच्या तयारीत आहे. “ओबीसींच्या प्रश्नावरील उपसमितीचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे, मराठा आरक्षणाच्या उपसमितीवर मराठा अध्यक्ष, मग मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे?’ असा सवाल राऊत यांनी केला. महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागातर्फे आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजू पारवेंसह अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी बैठकीचे संचालन केले. वीजमाफीची घोषणा मागे घेण्यास लावल्यापासून पवार आणि राऊत यांच्यात हे शीतयुद्ध सुरू आहे. ऊर्जा खात्याचे ११ प्रस्ताव अर्थ खात्याने बासनात गुंडाळून ठेवले आहेत.

या आहेत काँग्रेस अनु. जाती-जमाती समितीच्या तक्रारी
- भाजप सरकारने डिसेंबर २०१७ मध्ये काढलेला शासन आदेश रद्द व्हावा, अशी मागणी अजित पवारांच्या उपसमितीकडे केली होती, त्यावर अजून कार्यवाही नाही.
- मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण मिळावे यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडण्यासाठी ठोस तयारी होत नाही.
- यासाठी आवश्यक आकडेवारीच्या संकलनासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नियुक्तीचा निर्णय झाला, पण त्याचा शासन आदेश नाही.

बातम्या आणखी आहेत...