आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:लो. पाटील स्कूलमध्ये दिव्यांग दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा

सटाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. उपशिक्षक शेखर दळवी यांनी प्रास्ताविक करून मुख्याध्यापक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा शहरातून दिव्यांग दिनानिमित्त फेरी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सोनवणे, दळवी, उपशिक्षिका शेवाळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

संगीतशिक्षक अश्विन पाटील यांनी गायन करून कलाशिक्षक नंदकिशोर शेवाळे, अरुण भामरे यांनी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. शेतकरीमित्र बिंदू शर्मा यांनी शाळेला भेट घेऊन घेण्यात येत असलेल्या स्पर्धेबाबत समाधान व्यक्त केले व दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले. उपमुख्याध्यापक बी. जी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक बी. एन. देवरे, एच. डी. गांगुर्डे, सचिन सोनवणे, रोहित शिंदे, बी. टी. वाघ, अरुण पाटील, एस. वाय. भदाणे, ए. डी. अहिरे, एस. एस. सोनवणे, विजय बावा, मिलिंद शेवाळे, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...