आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचल प्रदेश येथे साउथ एशियन युथ टेबल टेनिस स्पर्धा 14 ते 17 मे दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 19 वर्षाखालील मुलींच्या भारतीय संघात तनिशा कोटेचा ची निवड झाली.
या स्पर्धेत भारताबरोबर बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशाचे संघ सहभागी होणार आहेत.
तनिशाला 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे दूसरे व चौथे मानांकन असून जागतिक स्तरावर तीला 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या गटात अनुक्रमे आठरावे व छत्तीसावे मानांकन आहे. या वर्षी पोर्तुगाल येथे झालेल्या डब्लूटीटी युथ कंटेंडर स्पर्धेत 17 व 19 वर्षाखालील दोन्ही गटात तीने कांस्य पदक मिळविले आहे.
त्याच बरोबर फ्रांस व बेल्जियम येथे झालेल्या डब्लूटीटी युथ कटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत ही तीने भाग घेतला आणि तेथेही उल्लेखनीय कामगिरी केली. या वर्षीच्या इंदोर येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही तीने अजिंक्यपद मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
त्याच बरोबर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने नासिकचे टेबल टेनिस प्रशिक्षक जय मोडक यांची या भारतीय संघाचे प्रशीक्षक म्हणून निवड केली आहे. तनिशा कोटेचा ही जय मोडक यांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहे. या दोघांचा सत्कार आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, अभिषेक छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक सुहास दीवसे, संजय मोडक, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, संजय वसंत, सतीश पटेल आदींनी अभिनंदन करून शुभेच्छादिल्या .
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.