आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोर्तुगल येथे झालेल्या डब्लूटीटी यूथ कंटेंडर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचा हीने १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटात कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापूर्वी तनिशा हीने जर्मनी, रोमानिया, फ्रांस, इटली व उजबेकिस्तान आदी देशातील खेळाडूंचा पराभव केला. तनिशाची हीची मागील सन २०२२ व आता सन २०२३ या कालावधीत पदक मिळविण्याची ही चौथी वेळ आहे.
अंतिम आठ मधे प्रवेश करण्यापूर्वी तनिशाने रोमानिया च्या एव्हिलीन उँगवरी हीचा ३-१ तर जर्मनी च्या लिसा वैंग चा ३-१ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ पडली रोमानियाच्याच बायंका मेई रोसुशी. अत्यंत अटीतटीच्या लढतीत 3-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिची गाठ पडली ती फ्रांस च्या यॅगथे अवेजोऊबरोबर. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात फ्रांसच्या खेळाडूने ३-२ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अशारीतीने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात तनिशाने कांस्य मिळविले.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत रोमानिया च्या बायंका मेई रोसुशी गाठ पडली. पाच गेम पर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात तनिशाने ३-२ असा पराभव करून आपले उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रांसच्या यॅगथे अवेजोऊ हीने तनिशाचा ३-० असा पराभव केला. अशारीतीने तनिषाने या गटातही कांस्य पदक पटकावले.
या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभीषेक छाजेड, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, सतीश पटेल, अलका कुलकर्णी, संजय मोडक, प्रकाश जसानी, महेंद्र चिपळूणकर, योगेश देसाई, सुहास आघारकर, दिलीप म्हसकर, आशिष बोडस, सुधीर मांजरे व आदीनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.