आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये संपूर्ण प्‍लॅस्टिक बंदी:आयुक्तांच्या अध्यक्षतेत कारवाईसाठी टास्क फोर्स; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते प्रदूषण लक्षात घेत तसेच पर्यावरणाचे धोक्यात आलेले संतुलन लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली शहर टास्क फोर्स स्थापन करून महापालिका क्षेत्रात पुर्णत: प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही जाडी अथवा लांबीचे प्लास्टिकचा वापर, विक्री, साठवणूक करण्यास बंदी घातली असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

प्लास्टिक बंदीबाबत यापूर्वी अनेक वेळा निर्णय झाले. मात्र अंमलबजावणी होत नव्हती. ही बाब लक्षात घेत आयुक्त पवार यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम,शिक्षणाधिकारी सुनिता धनगर, शिवाजी चव्हाणके, डॉ.आवेश पलोड यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह, इतर प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होत असलेली हानी या संदर्भात आयुक्तांनी पटवून दिले. त्यानंतर शहरातील प्लास्टिक वापर, विक्री, साठवणूकीचा आढावा घेतल्यावर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अधिसूचना 2018 ची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्लास्टिकच्या पिशव्या, बाउल, डब्यावर बंदी

प्लास्टिकच्या प्रतिबंधीत वस्तू, कम्पोस्टेबल प्लास्टिक( कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाउल, डबे यावर आता शहरात पुर्णपणे बंदी राहणार आहे. प्रतिबंधीत प्लास्टिक मग ते कोणत्याही जाडी अथवा लांबीचे असो त्याचा वापर, विक्री, साठवणूक याववर महापालिका कार्यक्षेत्रात पुर्णपणे प्रतिबंध करून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

महिनाभरात अडीच लाखांचा दंड

प्लास्टिकमुळे नदीप्रदूषणासह जैव विविधतेवर परिणाम होण्याबरोबरच पर्यटन स्थळे, शेती, वने व परिसंस्था आदी ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळणाऱ्या परिसंस्थांच्या सेवांवर अशा प्लास्टिक कचऱ्यांमुळे प्रतिकूल परिणाम होतो. ही बाब लक्षात घेत गेल्या महिन्याभरापासून महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अडीच लाखाचा दंड महिनाभरात वसूल केला आहे.

नागरीक, संस्था, कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, खानावळ, दुध विक्रेते, भाजी विक्रेते व अन्य सर्व प्रकारच्या कुठल्याही आस्थापनामध्ये कोणत्याही प्लास्टिकचा वापर किंवा साठवणूक होता कामा नये.या बाबींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे संबंधितांविरूध्द कारवाई करणेत येईल असा इशारा पालिकेने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...