आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:टाटा संशोधन संस्थेत भरती ; 4 ऑक्टोबरपर्यंत संधी

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आण्विक विज्ञान आणि गणित यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय केंद्र आणि एक अभिमत विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. प्रशासकीय सहायक - (बी), सुरक्षारक्षक आणि प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (सी) या पदांसाठी भरती होणार आहे.

ऑनलाइन अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढील २२ दिवस म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. तर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या व भारत सरकारच्या वय शिथिलतेसाठी पात्र असतील अशा उमदेवारांना ऑफलाइन म्हणजे पोस्टाने अर्ज करावयाचे आहेत. परंतु, अर्जासोबत वय शिथिलतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थलाला भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...