आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबिनार:कर सल्लागारांनी तंत्रज्ञानाचा वापर करून कामांना गती द्यावी ;सुमेरकुमार काले यांचा संवाद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही क्षेत्रामध्ये ठराविक वेळेनंतर बदल होत असतात, हे बदल सद्य परिस्थितीनुसार आवश्यकही असतात. जीएसटी कायदा आल्यापासून तर तो सर्वांना समजून घेण्यापर्यंत त्यात सातत्याने बदल होत गेले त्यामुळे आपल्याला वस्तू व सेवा कर कायदा समजून घेणे महत्त्वाचे आहे तरच आपण यशस्वी कर सल्लागार होऊ शकताे, असे मार्गदर्शन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाचे सदस्य सुमेरकुमार काले यांनी केले.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित,”कर व्यावसायिकांसाठी युक्तीच्या चार गोष्टी” या वेबिनारमध्ये काले मार्गदर्शन करीत हाेते.कर सल्लागार म्हणून काम करत असताना काटेकोरपणे नियोजन केले पाहिजे, विविध कामे करत असताना प्रत्येक कामाची मुदत लक्षात घेऊन त्यानुसार कामाचे नियोजन करा व वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा, असे आवाहन केले यांनी केले. सुत्रसंचालन नितीन डाेंगरे यांनी तर आभार अॅड.प्रदिप क्षत्रिय यांनी मानले.

कामाच्या व्यापात वैयक्तिक आयुष्य जपणे महत्त्वाचेच
वरिष्ठ कर सल्लागार अनिल चव्हाण म्हणाले की, वस्तू व सेवा कर कायद्याची अद्ययावत माहिती असणे तसेच त्याचा नियमित अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी आपण हाताळत असताना आपली दैनंदिन जीवनशैली व ऑफिसचे कामकाज यामध्ये समतोल साधावा. कामाच्या व्यापात वैयक्तिक आयुष्य देखील जपता आले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...