आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार कार्डच्या आधारसाठी शिक्षक दाराेदार:विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हरपला आधार; अध्यापनावर गंभीर परिणाम

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळाबाह्य कामामुळे अध्यापनाकडे हाेत असलेल्या दुर्लक्षानंतरही शिक्षकांवर मतदार कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी दाराेदार पाठवले जात असून या कामासाठी शहरातील मनपा व खासगी शाळेतील 80 टक्के शिक्षकांना जुंपल्यामुळे अध्यापनावर गंभीर परिणाम हाेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कडून शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा शाळा संपल्यानंतर कामे करा असे फर्मान सोडण्यात आले असून हे सर्व करून थकलेले शिक्षक शिकवणार कसे असा प्रश्न आहे.

मतदार यादीतील त्रुटी दुर करणे, बाेगस मतदारांची नावे वगळण्यासाठी राज्य निवडणुक आयाेगाने मतदार कार्डला आधार लिंक करण्याचे फर्मान साेडले. त्यानंतर, राज्य शासनाने यासंदर्भात नियाेजनाची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर साेपवली. राज्य शासनाने शहरी भागात महापालिकांना या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कर्मचारी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. मात्र कर्मचारी वर्ग करताना सूचनापत्रात कामाचे स्वरूप ऐच्छिक असल्याची नोंद केली. मात्र, हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती हाेत असल्याचे आराेप हाेत आहे.

पालिकेच्या उत्पन्नात खडखडाट असल्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुली महत्वाची आहे. मात्र, येथील 135 कर्मचारी वर्ग केल्यामुळे वसुली ठप्प झाली आहे. आता, पालिकेच्या 70 शिक्षकांना वर्ग केले असून काही शाळांमध्ये दहा शिक्षक असताना सात शिक्षकांना आधारसाठी नियुक्त केले गेले. त्यामुळे तीन शाळांवर कसे अध्यापन चालणार असा प्रश्न आहे. खासगी शाळेची व्यथाही अशीच आहे.

सिडकाेत पडताळणीची द्रविडी प्राणायम

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात सिडकाे व सातपुर हे पालिकेचे दाेन विभाग येतात. हे भाग कामगारबहूल असून याठिकाणी कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या भागातील नागरिकांची संख्या माेठी आहे. येथील अनेक मतदारांचे नाव गावात व सिडकाेतही आहे. त्यामुळे आपले गुपित फुटू नये म्हणून अनेक मतदार आधारकार्ड देण्यासाठी पुढीलवेळी या असे सांगून वेळकाढूपणा करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...