आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसोबत अश्लील कृत्य:विद्यार्थिनींचा विनयभंग, शिक्षकास  7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला माेपेड चालविण्यास शिकवण्याचा बहाणा करत तिचा व तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी या कलाशिक्षकाला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सोमवारी (दि. २१) जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी ही शिक्षा ठोठावली. अशोक रघुनाथ नागपुरे (५७, रा. गजपंथ स्टाॅप, म्हसरुळ) असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१८ ते २०२० या काळात आरोपी अशोक नागपुरे याने पीडित मुलीच्या मोपेडवर पाठीमागे बसला असताना मुलीसोबत अश्लील कृत्य केले. क्लासमध्येही चित्र काढण्यास शिकवताना नको त्या ठिकाणी ताे हात फिरवत होता. अशाचप्रकारे पीडित मुलीच्या मैत्रिणीसमोर आरोपीने अंगावरील सर्व कपडे काढून पीडितेच्या मैत्रिणीचा विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला हाेता. तत्कालीन महिला उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पंच, साक्षीदार व तक्रारदार यांनी दिलेली साक्ष आणि पुराव्यास अनुसरुन ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली. सरकार पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे, अॅड. रेश्मा जाधव यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...