आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:शिक्षिकेचा ध्यास ;  ७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकच्या मनपा शाळा क्र. ४९ मधील शिक्षिका किरण वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिष्यवृत्ती परीक्षेची चांगली तयारी करून घेतली. प्रसंगी पदरमाेड करत पुस्तकांचा खर्चही उचलला. यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे चार वर्षांसाठी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील आठवीतील एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. १९ जूनला झालेल्या या परीक्षेत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी राजरत्न वंजारे, सार्थक नेटारे, काजल पंडित, आरती मोहिते, निकिता पवार, सुमेध भवरे, शुभांगी अवचार हे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्यांना शिक्षिका किरण वाघमारे यांनी कोरोनाकाळातील नियमांचे पालन करीत, कधी विद्यार्थ्यांच्या घरी जात, कधी ओट्यावर, तर कधी दाराच्या बाहेर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.

बातम्या आणखी आहेत...