आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन राष्ट्रीय धोरण पेलण्यास शिक्षकानी समर्थ व्हायला हवे, शिक्षण व संस्कार रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे परखड मत भोसलाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी व्यक्त केले.
अखील भारतीय शिक्षा संस्थान विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी विद्याभारती परिचय वर्ग नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु .स .रुंगटा हायस्कूल येथील सभागृहात घेण्यात आला.
देशपांडे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षक वर्गाने हे अतिशय सखोलपणे समजून घेणे आवश्यक आहे शिक्षकांनीच या धोरणातील नवीन बदल अभ्यासक्रम याची माहिती घेऊन योग्य पद्धतीने मांडणी करणे गरजेचे आहे. या नंतर विद्याभारतीचा परिचय या विषयावर प्रांत मंत्री रघुनाथ देवीकर यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामधे विद्याभारतीचे विविध आयाम योग, क्रीडा, संगीत, नैतिक शिक्षण, वैदिक गणित, संस्कृती ज्ञान परीक्षा, बालिका शिक्षण, शिशु वाटिका या सह इतर विषयावर क्षेत्राचे शिशुवाटिका प्रमुख भाई उपाले यांनी अनेक उदाहरणे देऊन जीवनात या आयामांचे महत्व काय आहे, हे अतिशय अभ्यास पूर्ण रीतीने समजावून दिले.
शिक्षकांच्या आवडीनुसार गट करण्यात आले आणि गटचर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात आले. चौथे सत्र विद्याभारतीचा कार्यकर्ता कसा असावा या विषयावर भोसलाचे माजी प्राचार्य व प्रांताचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी अतिशय मार्मिक अशी उदाहरणे देऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल म्हणाले की, शिक्षकांनी चाकोरी बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले पाहीजे. विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने गप्पा मारा. त्यांना विचार करण्याचे, मत मांडण्याचे स्वातंत्र्य द्या. नक्कीच तुम्हाला वेगळे अनुभव मिळतील. सहमंत्री प्रगती भावसार, खेलकूद प्रमुख शिरीष नाईकरे उपस्थित होते. प्रांताचे सह मंत्री दादासाहेब काजळे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.