आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख शिक्षण द्यावे; शिक्षणतज्ज्ञ विजयालक्ष्मी मणेरीकर यांचे प्रतिपादन

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनावश्यक समाजाभिमुख शिक्षण आवश्यक आहे, त्या दृष्टीने पाठयक्रमबरोबरच कला, क्रीडा शिक्षणास व्यावसायिक पातळीवर जीवनमूल्य वाढविणारे विषय शिकविणे आवश्यक आहे. असे विचार शिक्षण अभ्यासक विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड महाराष्ट्राने आयोजित केलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्त आयाेजित हा कार्यक्रम नॅब संकुलात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी विजयालक्ष्मी मणेरीकर, सूर्यभान साळुंखे व मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री आदी होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

महानॅब स्कूलच्या प्रमुख मंगला कलंत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तर मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी परिचय करून दिला. महानॅब स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा साळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली लहरे तर आभार सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह संस्थेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...