आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहिमा:सिडकोतील हाेर्डिंगकडे साेयीस्कर दुर्लक्ष ; कारवाई हाेत नसल्याने नागरिकांनी केला आराेप

सिडको2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेकडून शहर हाेर्डिंग्जमुक्त करण्यासाठी अनधिकृत हाेर्डिंग्ज लावणाऱ्यांविराेधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी सिडकाेतील अनधिकृत हाेर्डिंग्जकडे साेयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पालिकेच्या या माेहिमेवरच संशय व्यक्त केला जात आहे.

सिडकाेतील उंटवाडीपासून त्रिमूर्ती चाैक, पवननगर, खुटवडनगर, आयटीआय सिग्नल ते माउली लाॅन्सचा रस्ता असाे की कामटवाडे, उत्तमनगर, राणेनगर, पाथर्डी फाटा परिसर असाे सर्वच परिसर हाेर्डिंगमुळे बकाल झाला आहे. तरीही याकडे पालिकेचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे काही लागेबांधे आहेत का? असाही संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...