आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कासाठी लढा:तहसीलदारांनी काळ्या फिती लावत केला शासनाचा निषेध; विविध मागण्यांसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांनी आंदोलनास टप्पेनिहाय सुरुवात केली असून दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (दि. १) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन करत शासनाचा निषेध केला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या पदोन्नत्या, रिक्त जागा आणि सेवाविषयक बाबीं अनेक वर्षापासून अद्यापही प्रलंबित आहेत. तहसीलदारांची संवर्गाची २०११ पासूनची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द केली नाही. नायब तहसीलदार संवर्गाचीही तीच गत आहे. नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात पदोन्नत्यांनाही न्याय मिळाला नाही. यासह विविध सेवा विषयक बाबींसाठी वारंवार निवेदने देऊन, मोर्चे आंदोलने काढूनही पुर्ती होत नसल्याने दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत टप्प्या - टप्प्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, भीमराज दराडे, नीलेश श्रृंगी, तहसीलदार अनिल दौंडे, परमेश्वर कासुळे, पंकज पवार, दीपक पाटील, राजश्री अहिरराव, शरद घोरपडे, नायब तहसीलदार विठ्ठल मोराणकर, संघमित्रा बाविस्कर, अर्चना पठारे, आदींसह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...