आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात प्रचंड गारवा:तापमान 10.4  अंश सेल्सिअस; दाेन दिवस थंडी कायम राहणार

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात किमान तापमानात घसरण झाली असून दोन दिवसांपासून शहरातील सकाळचे तापमान हे १० अंशांच्या दरम्यान जात आहे. त्यामुळे सकाळी वातावरणात प्रचंड गारवा जाणवू लागला आहे. साधारणपणे दोन दिवस शहरात किमान तापमान असेच राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला असल्याने नाशिककरांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागणार आहे.

शनिवारी (दि. १९) शहरातील हवामान केंद्रात १०.४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. सकाळपासूनच शहरातील वातावरणात गारवा हाेता. दुपारी थाेडे ऊन असले तरी उष्णतेची तीव्रता मात्र कमी हाेती.

बातम्या आणखी आहेत...