आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांवर राेषणाई:पहाटेपासूनच शिवमंदिरांत आज भाविकांना दर्शन लाभ

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावणाच्या दुसऱ्या साेमवारी, आज भाविकांना पहाटे ४ पासून त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर व साेमेश्वर मंदिरात दर्शन घेता येणार आहे. श्रावणानिमित्त मंदिरांवर राेषणाई करण्यात आली आहे. मंदिरांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.श्रावणातील साेमवारला विशेष महत्त्व असल्याने दर्शनासाठी भाविकांची शिवमंदिरात गर्दी हाेत असते. त्यादृष्टीने मंदिर समितीच्या वतीने नियाेजन करण्यात अडलेले आहे. कपालेश्वर मंदिरात रामकुंडासमाेरील प्रवेशद्वारातून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी ४.३० वाजता मंदिर परिसरातून पालखी निघणार आहे. साेमेश्वर मंदिरात सकाळी सहाला आरती हाेईल. भाविकांची गर्दी लक्षात घेता परिसरात बॅरिकेड्स लावले आहेत. टप्प्याटप्याने भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिर परिसरात सामाजिक संस्थाकडून रक्तदान शिबिराचे देखील आयाेजन केले आहे.

त्र्यंबक पहाटे ४ पासून दर्शन
ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावणी साेमवारनिमित्त एक तास आधी दर्शनाला सुरूवात हाेइल पहाटे ४ वाजेपासूून रात्री ९ वाजेपर्यंंत येथे दर्शन घेता येऊ शकेल. नियाेजनासाठी पाेलिस बंदाेबस्त तैनात असेल.

दर २ मिनिटांला बससुविधा
देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात. त्यांच्यासाठी एसटीतर्फे दर दाेन मिनिटांला जुने सीबीएस येथून त्र्यंबकेश्वरला बस साेडण्यात येईल. तसेच सिटीलिंकतर्फे १० जादा बसेस साेडण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...