आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची प्रतीक्षा संपली!:सप्तश्रृंगी देवीचे मंदिर नवरात्रोत्सवात उघडणार; 26 सप्टेंबरपासून भाविकांना घेता येणार दर्शन

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीचे मंदीर मागील 45 दिवसापासून दर्शनासाठी बंद आहे. उद्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले होणार होते. परंतु अद्यापही काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे. असे असतांना आता सप्तश्रृंगी देवीचे मंदीर नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच सोमवारी (26 सप्टेंबर) खुले होणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती सप्तश्रृंगी देवी संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

ढगफूटी झाल्याने बंद होते मंदिर

नाशिकमध्ये जुलै महिन्यात ढगफूटी झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच झालेल्या पावसामुळे अनेक भावी जखमी झाले होते. म्हणून या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद ठेवण्यात आले होते. शिवाय मंदिराच्या डागडुजी साठी भाविकांना दर्शनासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांना सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेता येणार आहे.

सप्तशृंगी देवीच्या मूळ स्वरूपाच्या संवर्धनासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने वेळोवेळी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय. आय. टी, पवई, (बॉम्बे) यांसह पुरातत्व विभागाच्या मार्फत अधिकृत असलेल्या में, अजिंक्यतारा कन्सल्टसी, नाशिक यांच्या मार्फत केलेले प्रत्यक्ष निरीक्षणे, अहवाला नुसार जिल्हा प्रशासनाशी योग्य ती चर्चा व समन्वय साधून मूर्ती संवर्धन व देखभाल प्रक्रियेचे काम सुरू करण्यात आले. श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून सावलेला शेंदूर लेपनाचा भाग (कवच) हा धार्मिक व शास्त्रोक्त पध्दतीने काढण्यात आला.

पितृपक्षामुळे लांबला मुहूर्त

दरम्यान, विलोभनीय व स्वयंभू स्वरूपात लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन उपलब्ध होणार आहे. मात्र दि.10 पासून पितृपक्ष सुरू होत असल्यामुळे शास्त्रानुसार सद्यस्थितीत भाविकांना दर्शन उपलब्ध करून देणे शक्य नाही. म्हणून शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही आवश्यक धार्मिक विधी पूर्ण होणे आवश्यक आहेत, म्हणून संस्थान चे वतीने पितृपक्षापूर्वी आवश्यक ते सर्व धार्मिक पूजाविधी करून नवरात्रीच्या पहिल्या माळेला श्री सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध धार्मिक पीठातील विद्वान तसेच श्री क्षेत्र काशी येथील धर्मशास्त्र पारंगत पं गणेश्वरशास्त्री द्रविड, श्री. क्षेत्र नाशिक येथील स्मार्त चूडामणि पं शांताराम शास्त्री भानोसे, येथील पुरोहित संघाच्या मार्गदर्शना प्रमाणे हे सर्व धार्मिक विधी निर्धारित केलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...