आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दहा वेळा‎ मुदतवाढ; डी फार्मसीचे प्रवेश रखडले‎ 7 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत; वर्ग दिवाळीनंतरच

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक दोन वेळा नव्हे तर वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने डी. फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यंदा लांबण्याची चिन्हे आहेत. ९ जूनपासून सुरू झालेले प्रवेश अर्ज प्रक्रिया यावर्षी तब्बल पाच महिने पूर्ण होऊनही सुरूच आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला असून दि. ७ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. वारंवार दिल्या जाणाऱ्या मुदतवाढीमुळे प्रवेश प्रक्रिया रखडली असून नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया होऊन नवीन वर्षात म्हणजेच दिवाळीनंतर जानेवारीमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी मिळणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होण्याची शक्यता आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या या प्रक्रियेत प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जात आहे. अनेक विद्यार्थी विहित मुदतीत अर्ज करत नाही. त्यांच्या शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी मुदतवाढ दिले जाते, असे सांगितले जाते. मात्र, आतापर्यंत चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार औषधनिर्माणशास्त्र शाखेतील डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. याच वाढीव कालावधीत नव्याने नोंदणी केलेल्या व यापूर्वी नोंदणी केलल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

फार्मसी कौन्सिलच्या तपासणीत आढळल्या अनेक त्रुटी‎
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे‎ दरवर्षी फार्मसी कॉलेजचे तपासणी‎ (इन्स्पेक्शन) केले जाते. या तपासणीत‎ राज्यभरातील फार्मसी महाविद्यालयांत‎ आवश्यक असलेल्या नियमांच्या पूर्तता‎ न झाल्याने अनेक त्रुटी आढळून आल्या.‎ यात सर्वाधिक त्रुटी कर्मचाऱ्यांच्या‎ नियुक्ती बाबत आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पीसीआयतर्फे ३०‎ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे‎ जोपर्यंत पीसीआयकडून मान्यतेचे पत्र‎ महाविद्यालयांना दिले जात नाही, तोपर्यंत‎ डीटीईला प्रवेश प्रक्रिया सुरू करता येत‎ नाही.

१३ ऑक्टोबरला अंतिम गुणवत्ता यादी
९ ऑक्टोबरला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यादीसंदर्भात तक्रारी, हरकती नोंदविण्यासाठी १० ते १२ ऑक्टोबर अशी मुदत दिलेली आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी १३ ऑक्टोबरला जाहीर होईल. नाशिक जिल्ह्यात ३१ महाविद्यालयांत १९५३ जागा उपलब्ध आहेत.

अभ्यासक्रम‎ कमी वेळेत पूर्ण करण्याचे‎ आव्हान
वारंवार अर्ज प्रक्रियेला मुदत वाढ दिली जात असल्याने प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. प्रवेश पूर्ण होऊन कॉलेज सुरू होण्यास अजून दोन महिने लागतील. त्यामुळे कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण‎ करण्याचे आव्हान असेल.‎- प्रा. नीलेश जाधव, प्राचार्य

बातम्या आणखी आहेत...