आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडघम:भगूर पालिकेत यंदा आठऐवजी दहा प्रभाग; सोमवारी आरक्षण सोडत जाहीर

देवळाली कॅम्प15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १३) आरक्षण जाहीर करण्यात आली. यंदा दोन प्रभागांची वाढ होऊन आठऐवजी दहा प्रभाग राहणार आहे. मुख्य अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग १० अ, प्रभाग २ अ आणि प्रभाग १ अ सर्वसाधारण अनु.जाती (महिला किंवा पुरुष) तर प्रभाग ८ अ अनु. जमाती सर्वसाधारणकरिता आरक्षण चिठ्ठीद्वारे लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आले. भगूर नगरपालिका कार्यालयात उपविभागीय अधिकारी नीलेश श्रींगी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, मुख्य लिपिक रमेश राठोड यांच्या उपस्थितीत श्रींगी व गायकवाड यांनी निवडणूक विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रथम प्रभाग १०, ९, २, १ यांच्या चार महिला आरक्षण चिठ्ठ्या कार्तिक खोकले या विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आल्या. अनुसूचित जाती महिला आरक्षण चिठ्ठ्या काढल्या आणि त्या प्रभाग १० व २ च्या निघाल्या तर यातील १ व ९ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण (महिला/पुरुष) ब खुला महिला इतर आयोगाच्या नियमानुसार प्रक्रिया करण्यात आली.

यावेळी आरक्षण सोडत बैठकीसाठी दीपक बलकवडे, अॅड. विशाल बलकवडे, कैलास भोर, अजय वाहणे. उत्तम आहेर, काकासाहेब देशमुख, श्याम ढगे, आर. डी. साळवे, नीलेश हासे, प्रसाद आडके, शंकरराव करंजकर, बाळू साळवे, संग्राम करंजकर, विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, विलास कासार, सुदेश वालझाडे, अभियंता रमेश कांगणे, शशांक तिवडे, रवींद्र संसारे, प्रकाश करंजकर उपस्थित होते.

..असे आहे आरक्षण प्रभाग १ : अ - अनुसूचित जाती (म./पु) ब - खुला महिला प्रभाग २ : अ - अनुसूचित जाती महिला ब - खुला सर्वसाधारण प्रभाग ३ : अ - खुला महिला ब - खुला सर्वसाधारण प्रभाग ४ : अ - खुला महिला ब - खुला सर्वसाधारण प्रभाग ५ : अ - खुला महिला ब - खुला सर्वसाधारण प्रभाग ६ : अ - खुला महिला ब - खुला सर्वसाधारण प्रभाग ७ : अ - खुला महिला ब - खुला सर्वसाधारण प्रभाग ८ : अ - अनुसूचित जमाती (म./पु) ब - खुला महिला प्रभाग ९ : अ - अनुसूचित जाती (म./पु) ब - खुला महिला प्रभाग १० : अ - अनुसूचित जाती - महिला ब - खुला सर्वसाधारण

बातम्या आणखी आहेत...